नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूडमध्ये लोकमान्य हास्य योग संघ अनंतकृपा शाखेच्या सदस्यांना योगाभ्यासासाठी मॅटचे वाटप तर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संपन्न

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी विविध उपक्रमांना भेटी दिल्या. आज स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीने माझ्या कोथरूड मतदारसंघातील लोकमान्य हास्य योग संघ अनंतकृपा शाखेच्या सर्व सदस्यांना योगाभ्यासासाठी मॅटचे वाटप तसेच भाजप नेते रणजित हरपुडे यांच्या पुढाकारातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज जागतिक योग दिनाचे औचित्य साधून स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीने माझ्या कोथरूड मतदारसंघातील लोकमान्य हास्य योग संघ अनंतकृपा शाखेच्या सर्व सदस्यांना योगाभ्यासासाठी मॅटचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप कोथरुड दक्षिण मंडल माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, मनिषा बुटाला, सी.ए. रोहित शाह, डॉ. प्रसाद आंबेकर, मानसी आंबेकर, शंकर गुंजाळ यांच्यासह हास्य योग परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोथरूड मतदारसंघातील भाजप नेते रणजित हरपुडे यांच्या पुढाकारातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजातील वंचित घटकांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, रणजित हरपुडे यांचे समाजाप्रती असलेले नि:स्वार्थी योगदान निश्चितच प्रेरणादायी असल्याचे उद्गार यावेळी पाटील यांनी काढले. यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, लक्ष्मी हरपुडे यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.