ख्यातनाम लेखक, “अरण्यऋषी” मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद… त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक, तसेच ज्येष्ठ लेखक मारुती चितमपल्ली यांचे निधन. सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार स्विकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने ते आजारी होते. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ख्यातनाम लेखक, “अरण्यऋषी” मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले कि, ख्यातनाम लेखक, “अरण्यऋषी” मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चित्तमपल्ली यांनी निसर्गाला शब्दरूप देत विपुल साहित्यसंपदा निर्माण केली. आदिवासी ज्ञानाचा संग्रह, पक्षीकोष, वनोपनिषद यांसारखे अमूल्य ज्ञान समाजाला दिले. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आणि याचवर्षी पद्मश्रीने सन्मानित झालेले हे थोर व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितमपल्ली यांना त्यांच्या जंगल आणि पक्ष्यांविषयीच्या अभ्यासामुळे अरण्यऋषी म्हणून ओळखले जात होते. 30 मार्च रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ते 93 वर्षांचे होते. या महान साहित्यिकाचा सन्मान यंदा पद्म पुरस्कारानं करण्यात आला होता. त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदीही भूषवले होते. वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर २० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. महाराष्ट्रातील निसर्ग आणि जंगलावरील कांदबऱ्यांनी घराघरात पोहचलेले साहित्यिक म्हणजे मारुती चितमपल्ली.