कोणत्या प्रकारचे लोकं यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत… देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीला बसण्यापूर्वी खुर्चीखाली वाकून बघावं, संजय राऊत यांचे टीकास्त्र

119

मुंबई : रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या व्हायरल व्हिडीओवरून सध्या राजकीय वतर्तुळात मोठा धुमाकूळ होत आहे. मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनी या व्हिडीओवरून गोगावलेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोणत्या प्रकारचे लोकं फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीला बसण्यापूर्वी खुर्चीखाली वाकून पाहिलं पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हटले कि, ‘शिंदेंचा एक गट आहे. तो अघोरी विद्येतून निर्माण झाला आहे. हा गट सर्वत्र असतो. हा गट दिवस रात्र अघोरी विद्येत गुंतलेले असतात. माझा कसा फायदा होईल हे पाहत असतात. ही अंधश्रद्धा असली तरी आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवानं पुरोगामीपणाला डाग लावणारं हे कृत्य समोर आले आहे. अशा लोकांच्या हातात राजकारण गेलं असेल तर शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्देव आहे, असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत राऊत म्हणाले, तर कोणत्या प्रकारचे लोकं फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीला बसण्यापूर्वी खुर्चीखाली वाकून पाहिलं पाहिजे, हे कि नक्की काय आहेत. महाराष्ट्राला काळीमा फासणारं हे कृत्य आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जसे ते मंत्र्यांचे पीए तपासून घेतायत तसे मंत्री ही तपासले पाहिजे. असे अघोरी विद्येत रममान असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी हे अघोरी विद्येचे प्रकार हे शिंदे गटाचे लोक ठिकठिकाणी करत आहेत, असे राऊत यावेळी म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, मी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. पण हे समोर येत आहे. कोणत्या मानसिकतेमध्ये या राज्याचे मंत्रिमंडळ आहे? महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणाशी यांना काही पडलेले नाही. जनतेच्या प्रश्नाचे काही पडलेले नाही. लोकशाही आणि विचारांचे काही पडलेले नाही. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करणं, मी हा शब्द मुद्दामून वापरत आहे. कारण हा शब्द इराण इज्राईल युद्धामध्ये आला आहे. इज्राईलने इराणच्या काही प्रमुख नेत्यांना एलिमिनेट केले आहे, असे त्यांनी म्हटले.

नेमकं प्रकरण काय ?

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.