नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने ‘मानसी’ या उपक्रमाअंतर्गत भव्य योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन… एक हजाराहून अधिक मुलींनी उत्स्फूर्त सहभाग

पुणे : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कोथरूड मतदारसंघातील वस्ती भागातील मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मानसी’ या उपक्रमाअंतर्गत भव्य योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एक हजाराहून अधिक मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध योगासने सादर केली. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सहभागी सर्व मुलींना आणि उपस्थितांना योग दिनाच्या शुभेच्छा देताना, “आनंदी आणि निरोगी जीवनासाठी प्रत्येक महिलेनं आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे,” असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी पाटील यांनी विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. मानसी उपक्रातून महिलांचे महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यासोबतच योगाचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. याकार्यक्रमात विविध प्रकराची आसन सादर करण्यात आली. विविध नृत्याचे देखील कार्यक्रम सादर करण्यात आले.
मुलींच्या शिक्षणासाठी खूप मोठी रक्कम देणगी स्वरूपात पाटील यांच्या पुढाकाराने देण्यात येते. ज्यांना अशी आवश्यकता असेल कि कॉलेजमध्ये जायचं आहे, फी भरायची आहे , पुस्तक, लॅपटॉप घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करा, त्याची छाननी करून तुम्हाला मदतीचा हात पुढे केला जाईल असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
या विशेष प्रसंगी माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, उद्योजिका स्मिता पाटील, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.