कोथरुड मतदारसंघातील माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या माध्यमातून नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य सेवकांना रेनकोट आणि छत्री वाटप

पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ चे माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या माध्यमातून आरोग्य सेवकांना रेनकोट आणि छत्री वाटप करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, समाजाची गरज ओळखून योजना राबविणे, हा माझा नेहमीच आग्रह असतो. त्या अनुषंगाने कोथरुडमध्ये विविध प्रकारचे सेवा प्रकल्प सुरू आहेत. दीपक पोटे यांनीही असेच उपक्रम राबविले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे पाटील म्हणाले.
यावेळी कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रतिक देसरडा, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, ॲड. मिताली सावळेकर, माजी नगरसेवक जयंत भावे, प्रशांत हरसुले, गिरीश खत्री, अमोल डांगे, दीपक पवार, ॲड. प्राची बगाटे, मंदार बलकवडे, अनुराधा एडके, आशिष काटे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि आरोग्य सेवक उपस्थित होते.