१४ कोटी सदस्यसंख्येचा नवा इतिहास…हे यश म्हणजे पक्षाच्या विचारसरणीवरील जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या संघटनशक्तीचा भक्कम पुरावा – मंत्री चंद्रकांत पाटील

22

मुंबई : देशभरातील समर्पित कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीमुळे भारतीय जनता पार्टीने आज १४ कोटी सदस्यसंख्येचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. हे यश म्हणजे पक्षाच्या विचारसरणीवरील जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या संघटनशक्तीचा भक्कम पुरावा आहे. भाजपा हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि शेवटी स्वतः’ या तत्वज्ञानावर चालणारा कोट्यवधी देशभक्तांचा मजबूत, सशक्त आणि सक्रिय परिवार आहे. या यशाच्या निमित्ताने, भाजपा परिवारातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता आणि समर्थकांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘विकसित भारत @ २०४७’ असा दूरदृष्टीपूर्ण संकल्प देशासमोर मांडला आहे. त्या संकल्पपूर्तीसाठी कोट्यवधी देशभक्तांनी भाजपा परिवारात सहभागी होत, राष्ट्रनिर्माणाच्या या यज्ञात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांचे भाजपा परिवारात हार्दिक स्वागत! ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मोदीजींच्या सर्वसमावेशक चतु:सूत्रीला देशवासीयांनी ज्या प्रकारे स्वीकारले आहे, त्याचे प्रतिबिंब या विक्रमी सदस्यसंख्येतून स्पष्टपणे दिसत असल्याचे पाटील यांनी म्हटले.

भाजपा हा शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी कार्यरत असलेला खरा ‘जनता’ पक्ष आहे. अंत्योदयाचा मूलमंत्र घेऊन चालणाऱ्या या परिवाराची वाटचाल भविष्यातही अधिक वेगाने, अधिक व्यापक पातळीवर सुरू राहील. देशभरातील प्रत्येक भाजपा सदस्याचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन! चला, एकत्र येऊया, राष्ट्रनिर्माणाच्या या यज्ञात हातभार लावूया, मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित भारत साकार करूया, असे पाटील आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.