भाजपा कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांच्या संयोजनातून फिरता दवाखाना या आरोग्य वारीचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला प्रस्थान करणाऱ्या वारकरी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, भाजपा कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर यांच्या संयोजनातून फिरता दवाखाना उपलब्ध करून देण्यात आला. या आरोग्य वारीचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
वारकरी मायमाउलींच्या आरोग्यासाठी ही रुग्णवाहिका सेवापथक संपूर्ण वारी मार्गावर मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून देणार आहे.
सर्व वारकरी भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बालवडकर यांनी या उपक्रमाबाबत माहिती देताना म्हटले कि, माझी आजी श्रीमती भिकाबाई शंकर बालवडकर गेल्या २५ वर्षांपासून आषाढी वारीत नित्यनियमाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत जायच्या. आज त्या आपल्या सोबत नाहीत…त्यांनी पांडुरंगाच्या चरणी विश्रांती घेतलीय. पण त्यांच्या त्या निष्ठेचा, त्या भक्तीचा वारसा आज आमच्यासाठी एक संकल्प आहे. त्यांच्या संकल्पातूनच गेली तीन वर्षं आम्ही रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचं पथक वारी मार्गावर पाठवतोय आणि यंदाही ही सेवा अधिक जोमाने तेवढ्याच श्रद्धेने देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, सुभाष भोळ, भाजपा नेत्या उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, निकीता माथाडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.