‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ यामुळे पुण्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास मदत होईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, संचलित ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ (SSKH) चे उद्घाटन केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या हॉस्पिटलमुळे पुण्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
पुण्यात यद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णालयाची आवश्यकता होती. ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ च्या निमित्ताने हि पूर्ण झाली. या हॉस्पिटलमधून रुग्णांना सेवा चांगली मिळावी अशा शुभेच्छा यावेळी पाटील यांनी दिल्या.
हि संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची भूमी आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला अतिशय उत्तम संदेश दिलेला आहे. जे का रंजले गांजले ,त्यासी म्हणे जो आपुले! तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा! गडकरी म्हणाले कि कराड परिवाराने शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आणि आता स्वास्थ्य या क्षेत्रात जे काम केलं हे खूप मोठं आहे. आजही आपल्या देशात लाखो लोक असे आहेत कि जे औषध विकत घेऊ शकत नाही. आईच्या समरणार्थ हि हॉस्पिटलची सेवा आपण सुरु केली हि खूप महत्वाची गोष्ट आहे कारण आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. हे अतिशय अत्याधुनिक हॉस्पिटल आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले. या हॉस्पिटल मधून गोरगरीब जनतेची उत्तम सोय होईल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पूर्ण परिवाराला आणि संस्थेला खूप मोठी शक्ती आणि टाकत सतत देत राहील, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
सदर रुग्णालयात आपत्कालीन सेवा, सीटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी, एक्स रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी सारख्या सेवा २४ तास उपलब्ध असतील. तसेच वैद्यकीय, हदयरोग, नवजात शिशु, शस्त्रक्रिया यांकरिता अतिदक्षता विभाग उपलब्ध आहे. मेडिसिन, सर्जरी, प्रसूतीशास्त्र, अस्थिरोग, सांधेरोपण, मणक्याचे विकार, मानसोपचार, त्वचाविकार, नेत्ररोग, कान -नाक-घसा, बालरोग, कॅन्सर चिकित्सा व उपचार, मेंदूविकार व चिकित्सा आणि त्यावरील उपचार इ. विशेष तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असतील. या रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालयीन सेवेत १०% सूट दिली जाणार आहे.रुग्णांना केंद्रस्थानी ठेऊन, सर्व सेवा-सुविधांनी सुसज्ज असे हे रुग्णालय पुणेकरांच्या सेवेत रुजू झाले आहे.
यावेळी मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री आणि पद्मभूषण विजय भटकरजी, माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड, हभप तुळशीराम अण्णा कराड, एमआयटी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.