‘कमवा आणि शिका’ सारख्या योजनांमुळे ग्रामीण आणि गरजू मुलींना शिक्षणात अधिक संधी मिळतील, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे “आनंदोत्सव २०२५” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून संस्थेचे अभिनंदन केले. यावेळी सोसायटी संचालित महाविद्यालये आणि शाळांच्या विविध पातळ्यांवरील याशानिमित्त प्राचार्य, मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यातील ४०० महाविद्यालये स्वायत्त असून येत्या काळात ही संस्था पाचशे पर्यंत नेण्याचा मानस असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. महाविद्यालयांना स्व्ययत्तता दिल्यानंतर त्यांना नवीन अभयसक्रम सुरु करण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या पाच लाख विद्यार्थिनींना कमवा व शिका योजनेअंर्तगत दर महिना दोन हजार रुपये मिळावेत म्हणून प्रयन्त सुरु आहेत. मुलींच्या फी माफीमुळे उच्च शिक्षणात त्यांचे प्रमाण वाढले आहे. ‘कमवा आणि शिका’ सारख्या योजनांमुळे ग्रामीण आणि गरजू मुलींना शिक्षणात अधिक संधी मिळतील, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
गडकरी यावेळी म्हणाले, काळाच्या ओघात आर्थिक विकासाला प्राधान्य मिळत आहे. परंतु भविष्यात चांगल्या समाजासाठी सुजाण नागरिक घडविण्यात शिक्षण महत्वाचे असते. ज्ञान आणि चांगला माणूस असणे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे यात फरक आहे. आयुष्यात सिद्धांत, नीतिमत्ता , मूल्य, गुणवत्ता महत्वाची असते, असे गडकरी यांनी म्हटले.
यावेळी खा. मेधाताई कुलकर्णी, आ. सिद्धार्थ शिरोळे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह निवेदिता एकबोटे यांच्यासह इतर मान्यवर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.