सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतली सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईतील प्रतिष्ठित सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाला आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देत महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट कॅम्पसमध्ये दुर्मिळ आणि ऐतिहासिक चित्रसंग्रहाचे जतन व प्रदर्शन व्हावे, यासाठी CRC (Centres of Research & Creativity) फंडाच्या माध्यमातून अत्याधुनिक आर्ट गॅलरी उभारण्यात यावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देत ३० डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव संतोष खोरगडे, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, महाविद्यालयाचे संचालक प्रा. राजीव मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.