प्रा. अशोक गजानन मोडक लिखित “Integral Humanism: A Distinct Paradigm of Development” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व परिसंवादाचा कार्यक्रम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

13

मुंबई : मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबळे यांच्या हस्ते प्रा. अशोक गजानन मोडक लिखित “Integral Humanism: A Distinct Paradigm of Development” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व परिसंवादाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुंबई विद्यापीठ आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून लेखक प्रा. मोडक यांना शुभेच्छा दिल्या व उपस्थित विद्वानांसोबत समृद्ध संवाद साधला.

या कार्यक्रमाला डॉ. रवींद्र कुलकर्णी (कुलगुरू, मुंबई विद्यापीठ), धनंजय सिंग, तसेच अनेक मान्यवर आणि अभ्यासक उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी त्यांच्या कार्यकाळात ‘अखंड मानवतावाद’ या कल्पनेच्या आधारे काम केले. येणाऱ्या काळात शैक्षणिक दृष्टिकोनातूनही अखंड मानवतावादाची कल्पना महत्त्वाची ठरेल.

यावेळी होसबळे म्हणाले की पाश्चात्य संस्कृती आदर्शवादावर विश्वास ठेवते. ज्यामध्ये विशिष्ट परिस्थिती आदर्श मानली जाते आणि प्रत्येकाने तिचे पालन करावे लागते. तर आपल्या पूर्वजांनी तत्वज्ञानाला जन्म दिला. ज्यामध्ये तुम्ही स्वतः तुमचे जीवन घडवता, स्वतःचा मार्ग शोधता.

या पुस्तकात, प्राध्यापक मोडक यांनी आधुनिक भारताच्या दृष्टिकोनातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या अविभाज्य मानवतावादाच्या तत्त्वांचे स्पष्टीकरण दिले आहे. हे पुस्तक इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) ने प्रकाशित केले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी अविभाज्य मानवी तत्वज्ञानाद्वारे दिलेला संदेश या पुस्तकाद्वारे समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम अशोकराव मोडक यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.