10वी नंतरच्या कला पदविका अभ्यासक्रमांसाठी कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक 7 जून 2025 पासून सुरू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

11

मुंबई : इयत्ता 10वी नंतरच्या कला पदविका अभ्यासक्रमांसाठी कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक 7 जून 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी वेळापत्रक पाहून प्रवेश घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत अधिक माहिती शेअर केली आहे. कला पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश संख्या वाढविण्याच्या दृष्टीने ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षा दिलेली आहे. अश्या 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कला पदविका अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेण्यासाठी 1,20,741 विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वणीवर खालील संदेश पाठविण्यात आलेला आहे.

प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक http://doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश(Admission) या टॅब अथवा http://doaonline.co.in/DIP25/ या लिंकवर उपलब्ध आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.