भाजपा कोथरुड मध्य मंडलाची कार्यकारिणी जाहीर… भाजपामध्ये पद म्हणजे जबाबदारी असते – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कोथरुड मध्य मंडलाची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपामध्ये पद म्हणजे जबाबदारी असते. आज ज्यांना पद मिळाले, ते जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. गेल्या ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करीत आहे. जवळपास २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वर आली आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात राज्य प्रगतीपथावर आहे. कालच देवेंद्रजींनी शेतीसाठी कमी दराने वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हे सर्वापर्यंत पोहोचवावे, अशी सूचना देखील पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, उपाध्यक्ष नितीन शिंदे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला उपस्थित होते.