चिपळूण तालुक्यातील लाभार्थ्यांना 2 दुधाळ गायी-म्हशींचे गट वाटप आणि शेळी गट अनुदानाचे धनादेश वाटप कार्यक्रम आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

चिपळूण : सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत चिपळूण तालुक्यातील लाभार्थ्यांना 2 दुधाळ गायी-म्हशींचे गट वाटप आणि शेळी गट अनुदानाचे धनादेश वाटप कार्यक्रम सावर्डे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले. हा उपक्रम पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आपले मत व्यक्त करताना आमदार निकम यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत गायी-म्हशींची योग्य निगा राखून उत्पन्नवाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी अधिक प्रयत्न करावेत, असे सांगितले. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा ठरत असून भविष्यात अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा असे निकम यांनी आयोजकांना सांगितले.
या योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांमध्ये सुधीर सावर्डेकर (असुर्डे), शरयु सावर्डेकर (रामपूर), चैतन्य मयेकर (कुटरे), संदीप राजेशिर्के (कुटरे), बाबाराम जाधव (दळवटणे), आणि शाबीरा पटाईत (कान्हे) यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी पशुसंवर्धन विभाग उपायुक्त डॉ. सोनावळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. काणसे , सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, डॉ. बारापत्रे, डॉ. बाळाजी डोंगरे, डॉ. पेढांबकर, डॉ. होणराव, शौकत माखजनकर, विजय भुवड आदी मान्यवर उपस्थित होते.