शिक्षणात गुंतवणूक ही केवळ विकासाची नव्हे, तर भविष्यातील पिढीला सक्षम करण्याची प्रक्रिया आहे – आमदार शेखर निकम

चिपळूण : कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे, त्यांच्या कार्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत चिपळूण तालुक्यातील आगवे व मांडकी येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थिनींना सायकल व हायजीन किट, तसेच खरवते व मांडकी शाळांना कंप्युटर सेट व प्रिंटर देण्यात आले. हा उपक्रम आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
शेखर निकम यावेळी म्हणाले, मी स्वतः शिक्षक कुटुंबातून आलो असल्यामुळे शिक्षणात गुंतवणूक ही केवळ विकासाची नव्हे, तर भविष्यातील पिढीला सक्षम करण्याची प्रक्रिया आहे, असे मी मानतो. सायकलमुळे मुलींना शाळेत पोहोचणं सोपं होईल, हायजीन किटमुळे त्यांचे आरोग्य टिकेल आणि संगणक-संवर्धित शिक्षणामुळे त्यांना जगाच्या स्पर्धेत उतरण्याची तयारी होईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला रत्नागिरी क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक बापट साहेब, वरिष्ठ क्षेत्रीय कार्मिक अधिकारी महेश सारवळकर, जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई , रणजीत केसरे, अरविंदकुमार, महेश रेवंडकर, तसेच कोकण रेल्वेची प्रेरणादायी टीम, मा. सभापती पुजा निकम, प्राचार्य मंगेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.