भाजपा कोथरुड दक्षिण मंडलची कार्यकारिणी जाहीर… समाजाची गरज ओळखून पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम राबविले पाहिजेत – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या यशस्वी कामगिरी च्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कोथरूड दक्षिण मंडलाच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ’ आणि नूतन कार्यकारिणी घोषणा कार्यक्रम आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदाला योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, समाजाची गरज ओळखून पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम राबविले पाहिजेत, अशी सूचना यावेळी पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना केली.
यावेळी शहर अध्यक्ष धीरज घाटे, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस पुनीत जोशी, माजी सरचिटणीस गणेश घोष, भाजपचे इतर पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.