उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कै. बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्राच्या इमारत बांधकामाबाबत आढावा बैठक संपन्न

मुंबई :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील कै. बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्राच्या इमारत बांधकामाबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान इमारतीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, येत्या काही महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, बांधकामाच्या दर्जावर विशेष लक्ष देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीस माजी मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, प्रताप लुबाळ, संतोष खोरगडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.