UPSC परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांना आणखी सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी UPSC परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचेही अधिकाऱ्यांना सूचित केले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, तसेच प्रशिक्षण केंद्रांचे संचालक उपस्थित होते.