पुण्यात गुजराती बंधू समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘जयराज स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कन्वेन्शन सेंटर’ या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न

12

पुणे : पुण्यात गुजराती बंधू समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘जयराज स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कन्वेन्शन सेंटर’ या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते संपन्न झाले. या विशेष प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माधुरीताई मिसाळ, नितीनभाई देसाई, राजेश शाह यांच्यासह मोठ्या संख्येने गुजराती समाजबांधव उपस्थित होते.

अमित शाह यांनी या इमारतीचे वर्णन “संपूर्ण देशातील गुजराती समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात सुंदर इमारत” असे केले. “ही श्री पूना गुजराती बंधू समाज आहे, जी संपूर्ण देशातील गुजराती समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात सुंदर इमारत आहे. मी गुजरात सरकारमध्ये मंत्री असताना, तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराती समुदायासाठी इमारतींच्या विकासासाठी ५ कोटी रुपये दिले होते,” असे ते म्हणाले. २०१२ ते २०२५ या १३ वर्षांच्या कालावधीत सदस्यांच्या योगदानाने, कोणत्याही वादाशिवाय आणि योग्य मार्गदर्शनाने हे केंद्र बांधण्यात आले आहे. विविध उद्योगांना सेवा देणारी व्यवसायाभिमुख दृष्टिकोन असलेली पूर्णपणे आधुनिक रचना बांधण्याच्या सोसायटीच्या प्रयत्नांचे शहा यांनी कौतुक केले.

शाह पुढे म्हणाले, “पुण्य नगरी, हे शहर संपूर्ण देशासाठी ज्ञान, राष्ट्रवाद, सामाजिक जाणीव आणि स्वातंत्र्याचे प्रतीक राहिले आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यात या शहराने आघाडीवरून नेतृत्व केले आहे. जेव्हा भारताने मुघलांशी लढा दिला तेव्हा शिवाजी महाराजांनीच या भूमीतून ‘हिंदवी स्वराज्य’चा पाया घातला. ब्रिटिश काळात लोकमान्य टिळकांनी येथेच गर्जना केली होती, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ हे एक वाक्य तरुणांसाठी मंत्र बनले आणि देशभरात स्वातंत्र्य चळवळ पेटवली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आपण अखेर स्वातंत्र्य मिळवले. हे पवित्र शहर आपल्या वेद आणि उपनिषदांचे, आपल्या साहित्याचे आणि कलांचे जन्मस्थान राहिले आहे. तसेच, महाराष्ट्राने सामाजिक सुधारणांचा मार्ग मोकळा केला आहे. भक्ती चळवळीचे अनेक संत येथून आले आहेत, असे शाह म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले कि, १०० वर्षांहून अधिक काळ पुण्याच्या समृद्ध परंपरेचा भाग झालेल्या गुजराती समाजाने हे भव्यदिव्य भवन उभारल्याबद्दल गुजराती समाजाचे अभिनंदन केले. पुण्याच्या भूमीत हे भवन उभारण्याचे स्वप्न आपण पाहिलेत आणि आज त्याला मूर्त स्वरूप येत आहे. या वास्तूचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते झाले होते आणि आज अमित भाई शाह हे या वास्तूच्या उद्धाटनासाठी आले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव आमच्या गाठीशी असून त्याच बळावर गेल्या तीन वर्षात राज्याचा वेगाने विकास करता येणे शक्य झाले असल्याचे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.