‘शाश्वत कृषी संजीवनी’ हे पुस्तक कृषी विद्यापीठ तथा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचले पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : प्रख्यात ब्रिटिश कृषितज्ज्ञ सर अल्बर्ट हॅावर्ड यांच्या १९४० साली प्रसिद्ध झालेल्या ‘An Agricultural Testament’ या महत्त्वपूर्ण इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रा. अनिल व्यास यांनी ‘शाश्वत कृषी संजीवनी’ या शीर्षकाने केला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यात उत्साहात पार पडला. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन केले.
यावेळी खा. प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी, डॅा.पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, पुणे कृषी विद्यापीठाचे प्राचार्य तथा सहयोगी अधिष्ठाता महानंद माने, डॅा. मदन गोपाल वार्ष्णेय, स्नेहल प्रकाशनचे रविंद्र घाटपांडे, स्नेहलता सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
हे पुस्तक कृषी विद्यापीठ तथा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
सर अल्बर्ट हॉवर्ड सीआयई हे एक इंग्रजी वनस्पतिशास्त्रज्ञ होते. भारतात काम करताना त्यांना सामान्यतः पॅथॉलॉजिस्ट मानले जात असे; कंपोस्ट वापराचे आरोग्यात वाढ होण्याचे महत्त्व त्यांनी सातत्याने निरीक्षण केले आहे. त्यांच्या या ग्रंथातून कृषी संबंधित महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे.