भाजपा पुणे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सुरु करण्यात आलेल्या ई-सेवा केंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

पुणे : भाजपा पुणे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर यांच्या शिवाजीनगर मधील जनसंपर्क कार्यालयामध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या ई-सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र साळेगावकर यांना या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ. सिद्धार्थजी शिरोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, सचिन वाडेकर, अपर्णा कुऱ्हाडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या उपक्रमामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक महत्त्वाच्या योजना व सेवा मोफत मिळणार आहेत. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे साळेगावकर यावेळी म्हणाले.