मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न

26

मुंबई : विधानभवन, मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या सोहळ्याला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनय कोरे, मंत्री हसन मुश्रीफ व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवरांनी कार्यालयाची पाहणी केली आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आगामी कार्ययोजनांसाठी शुभेच्छा दिल्या. जनसुराज्य पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना आमदार विनय कोरे यांनी केली.

यावेळी खासदार धैर्यशिल माने,हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे जनसुराज्य शक्तीचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू),आमदार विश्वजित कदम,आमदार सतेज उर्फ बंटी पाटील,जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने (भैय्या) यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.