नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने एरंडवणे रजपूत वीटभट्टी परिसराचा रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे रजपूत वीटभट्टी परिसराची रस्ता रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मात्र, यासाठी जमीन अधिग्रहण होत नसल्याने, हा प्रश्न प्रलंबित होता. अखेर हा प्रश्न सोडविण्यात यश आले असून, रुंदीकरणानंतर आता हा रस्ता १२ मीटरचा झाला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय प्रशस्त झाला असून, कोथरुडकरांची मोठी सोय झाली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली कि, एरंडवणे रजपूत वीटभट्टी परिसराची रस्ता रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर हा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. हा प्रलंबित प्रश्न सोडविण्यामध्ये महापालिका प्रशासन, स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक यांची मोलाची साथ मिळाली, त्याबद्दल मी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच पुढील टप्प्यातील रस्त्याचे रूंदीकरण लवकर होईल, अशी अपेक्षा असल्याचे देखील त्यांनी म्हटले. कोथरुडकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे, अशी पुन्हा एकदा ग्वाही पाटील यांनी दिली.