परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

65

मुंबई : “नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल. सर्व रास्त मागण्यांवर न्याय्य तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्यावतीने विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन प्रसंगी सहभागी परिचारिका (नर्सेस) यांनी विविध मागण्या मांडल्या.

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आझाद मैदान येथे आंदोलनकर्त्या नर्सेसशी थेट संवाद साधला व त्यांचे म्हणणे अत्यंत संवेदनशीलपणे ऐकून घेतले आणि त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.

यावेळी फेडरेशनच्या संस्थापक सल्लागार श्रीमती कमल वायकोळे, अध्यक्ष श्रीमती थोरात व राज्य सरचिटणीस विशाल सोनार उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.