मावळचे माजी आमदार आणि शिक्षणमहर्षी दिवंगत कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबीयांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सांत्वनपर भेट

तळेगाव-दाभाडे : मावळचे माजी आमदार आणि शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन, कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. या भेटीत कृष्णरावांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
चंद्रकांत पाटील यांनी आज भेगडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत या दुःखद प्रसंगी आम्ही भेगडे कुटुंबियांच्या शोकात सहभागी असल्याचे म्हटले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.
मावळचे माजी आमदार आणि शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. जनसंघापासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी दोन वेळा विधानसभेवर मावळचे प्रतिनिधित्व केले. कृष्णराव भेगडे यांनी मावळात कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडी व्हावी यासाठी ठिकठिकाणी संस्थेच्या माध्यमातून शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये सुरू केली.