बाणेर-बालेवाडी परिसरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अपूर्ण रस्ते आणि सार्वजनिक सोयी-सुविधा यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे : बाणेर-बालेवाडी परिसरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अपूर्ण रस्ते आणि सार्वजनिक सोयी-सुविधा यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीस पुणे महापालिका, वाहतूक पोलिस, पोलिस आयुक्त कार्यालय, एनएचएआय, पीएमआरडीए आदी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नागरिकांकडून आलेल्या समस्यांची गांभीर्याने नोंद घेतली आणि संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी पाटील यांनी दिले.
या बैठकीस बालेवाडीतील सर्व फेडरेशनचे प्रतिनिधी, तसेच पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस, महाळुंगे येथील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, तसेच भाजपाचे कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, गणेश कळमकर, पुनीत जोशी, प्रकाश तात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, ज्योतीताई कळमकर, स्वप्नाली सायकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, शिवम सुतार, शिवम बालवडकर, अस्मिता करंदीकर तसेच कोथरूड उत्तर मंडलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.