माजी नगरसेवक स्वर्गीय सुभाष वोरा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा उदघाटन समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनसंघ व भारतीय जनता पार्टी या तीनही आघाड्यांवर प्रभावी सामाजिक आणि राजकीय कार्य केलेले, माजी नगरसेवक स्वर्गीय सुभाष वोरा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा उदघाटन समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या अभ्यासिकेचे उद्घाटन रविवारी कोल्हापूरमधील बिंदू चौक येथे असलेल्या जुन्या भाजपा कार्यालयाच्या इमारतीत करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून चालवण्यात येणारी ही मोफत अभ्यासिका सुरु करण्याची संकल्पना चंद्रकांत पाटील यांची आहे . या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ३४ विद्यार्थी बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे व त्यांना अभ्यासासाठी लागणारी साधनसामग्री पुस्तके या सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे पाटील यांनी म्हटले.
स्व. सुभाष वोरा यांचे कार्यपद्धती व पक्षनिष्ठेची ओळख प्रत्येक नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल त्यांच्या आठवणी आणि कार्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. या अभ्यासिकेमुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होऊन देशाला उत्तम दर्जाचे प्रशासकीय अधिकारी मिळतील असा विश्वास यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.