मुंबई विद्यापीठाच्या न्यू गर्ल्स वसतिगृहात उपलब्ध असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी गठीत समितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या न्यू गर्ल्स वसतिगृहात उपलब्ध असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी गठीत समितीची बैठक मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे पार पडली.
या बैठकीत वसतिगृहातील पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा, भोजन व्यवस्था, तसेच विद्यार्थिनींसाठी सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उच्च शिक्षण विभागाने यासाठी विशेष समिती गठीत केली असून, ही समिती वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी करून आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली.
या बैठकीस आ. प्रवीण दरेकर, सुधीर गाडगीळ, अनिल परब, निरंजन डावखरे, मनीषाताई कायंदे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.