भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष कुणाल टिळक आयोजित भव्य नोकरी महोत्सव हा उपक्रम रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण ठरेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी देखील फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य अशा नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थित तरुणांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कौशल्यावर आधारित रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होत असल्याने, तरुणांनी आपल्या कौशल्यांचा विकास करून स्पर्धात्मक युगात पुढे येणे आवश्यक आहे, असे यावेळी सांगितले. हा उपक्रम रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास देखील पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
भावे हायस्कुल, पेरू गेट, सदाशिव पेठ येथे आयोजित या भव्य नोकरी महोत्सवात ५० हुन अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. स्पॉट सिलेक्शन आणि इंटरव्हू देखील येथे आयोजित करण्यात आले होते, त्यामुळे हजारो तरुणांना रोजगार संधी येथे उपलब्ध करून देण्यासाठीची हि एक उत्तम संधी म्हणावी लागेल. हजारो तरुणांनी येथे उपस्थित राहून स्टॉल्स ला भेटी दिल्या.