भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने शहरातील नऊ मंडळांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन… या रक्तदान शिबिरांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

14

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र यांच्यातर्फे राज्यभरात “महा रक्तदान संकल्प” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने शहरातील नऊ मंडळांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराना आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेटी दिल्या.

सेवा रुग्णालय कसबा बावडा, राधाकृष्ण मंदिर शाहुपुरी, महादेवराव जाधव वाचनालय टाकाळा, शिवाजी तरुण मंडळ शिवाजी पेठ, दैवज्ञ बोर्डिंग मंगळवार पेठ, नेहरूनगर सोसायटी हॉल, खेल खंडोबा मंदिर परिसर हॉल या ठिकाणी रक्तदान शिबिरे संपन्न झाली.

या रक्तदान शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज दिवसभरात झालेल्या सर्व ठिकाणच्या रक्तदान शिबिरांमध्ये 500 हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

याप्रसंगी आमदार अमलजी महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व मंडल अध्यक्ष यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.