मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ₹१ लाखाचा धनादेश सुपूर्द

पुणे : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज जन्मदिवस. आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, बॅनर आणि होर्डिंग लावण्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत आज राज्यभर रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली. यासोबतच अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देखील मदतीचा हात पुढे केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹१ लाखाचा धनादेश सुपूर्द केला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹१ लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या माध्यमातून गरजू नागरिकांना थेट मदत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी म्हटले.
भारतीय जनता पक्षाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी माहिती दिली होती कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “जर कोणी होर्डिंग्ज, बॅनर किंवा जाहिराती लावल्या तर पक्ष त्यांच्यावर गंभीर शिस्तभंगाची कारवाई करेल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मुख्यमंत्री मदत निधीत योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणालाही पक्ष आवाहन करत आहे,” असे भाजप राज्य कार्यालयाने कळवले होते.