उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत “नालंदा कला आणि संस्कृती केंद्र” आयोजित “स्व-अभिव्यक्ती” या नृत्य महोत्सव उत्साहात संपन्न

मुंबई : “नालंदा कला आणि संस्कृती केंद्र” आयोजित “स्व-अभिव्यक्ती” या नृत्य महोत्सवास आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत नृत्याचा आनंद घेतला. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कवितांवर आधारित भरतनाट्यम, मोहिनीयट्टम, ओडिसी, कथक व विविध लोकनृत्य प्रकारांतून अत्यंत मनोज्ञ सादरीकरण करण्यात आले.
“स्व-अभिव्यक्ती” या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि मूल्य अधोरेखित करणारा एक प्रेरणादायी प्रयत्न अनुभवता आला, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. “स्व-अभिव्यक्ती” या उत्सवात कलाकारांनी विविध नृत्यशैली सादर केल्या, ज्यात भारतीय शास्त्रीय नृत्यातील बंदिश आणि सादरीकरणातील बारकावे दर्शवले गेले. या उद्देश, कलेच्या माध्यमातून स्व-अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे हा आहे.
या प्रसंगी आमदार पराग आळवणी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, नालंदा कला व संस्कृती केंद्राचे अध्यक्ष राहुल रेळे, नालंदा नृत्यकला महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.