वाहतूक कोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोथरुडमधील त्यांच्या निवासस्थानी वाहतूक कोंडीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. कोथरूडमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ५० वॅार्डन नियुक्तीसंदर्भात लवकरच कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून आश्वस्त करण्यात आले.
वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांची पाहणी करून, आवश्यकतेनुसार वाहतूक पोलीसांची नियुक्ती केली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात यावेळी आली. या बैठकीदरम्यान वाहतूक कोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, असे चंद्रकांत पाटील यांनी निर्देश दिले. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक्तेनुसार सीसीटीव्ही आणि एआय चलानची संख्या वाढवा, अशी सूचनाही त्यांनी बैठकीत केली.
यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.