बाणेर, पाषाण, बालेवाडी, सुतारवाडी परिसरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, खड्डेमय रस्ते, ‘मिसिंग लिंक’ यांसारख्या गंभीर समस्यांवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

पुणे : बाणेर, पाषाण, बालेवाडी, सुतारवाडी परिसरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, खड्डेमय रस्ते, ‘मिसिंग लिंक’ यांसारख्या गंभीर समस्यांवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील निवासस्थानी आढावा बैठक घेतली. बाणेर-पाषाण लिंक रोड संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
अतिक्रमण हटवणे, रस्त्यांचे रुंदीकरण व दुरुस्ती या कामांवर यावेळी चर्चा झाली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या प्रश्नांवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी व आयुक्तांसोबत विशेष बैठक घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उपअभियंता दिलीप काळे, कनिष्ठ अभियंता शिवानंद पाटील, भाजपा सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, उत्तर मंडल सरचिटणीस अस्मिता करंदीकर, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर आदी उपस्थित होते.