शहराच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची पूर्तता गतीने करणे आवश्यक, ‘PPCR – Pune Vision 2030’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘PPCR – Pune Vision 2030’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन पुण्याच्या विकासाबाबत आपल्या संकल्पना मांडल्या. ‘भविष्यातील पुणे – पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्थेची दिशा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात चंद्रकांत पाटील यांनी महत्वपूर्ण मुद्दे मांडले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, डॉ. सुधीर मेहता, उद्योजक अभय भुतडा, डॉ. नकुल शहा. डॉ. बहार कुलकर्णी, मनोज पोचट यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञ उपस्थित होते.
शहराच्या विकासासाठी पायाभूत सुविधाची पूर्तता गतीने करणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी पाटील यांनी मांडली. शहराच्या विकासात पुणेकर निश्चितच साथ देतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. पुण्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रिंगरोड, मेट्रो विस्तार, नव्या विमानतळाची उभारणी यांसारख्या प्रकल्पांची अंमलबजावणी जलद व दर्जेदार कशी होईल, यावर विस्तृत भूमिका मांडली. तसेच, पुण्याच्या प्रगतीमध्ये नागरी विमान वाहतुकीची भूमिका कशी वाढवता येईल, याविषयीही दूरदृष्टीपूर्ण मते व्यक्त केली. पुणेकरांच्या सहकार्याने शहराच्या विकासात सकारात्मक बदल घडवण्याचा दृढ संकल्प असून पुणेकर निश्चितच साथ देतील, हा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत २०४७ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचां विकसित महाराष्ट्र २०४७ हा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी ‘विकसित पुणे’ हा भागही महत्त्वाचा असून त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार पुण्याच्या विकासासाठी निश्चितच कटिबद्ध असल्याचे मोहोळ यांनी म्हटले.