उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते समाजगुरूंचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : गुरुपौर्णिमेनिमित्त पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन आणि विद्या प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजच्या के.बी. जोशी हॉल येथे विविध क्षेत्रांतील मान्यवर समाजगुरूंचा गौरव सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाचे माजी उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. शंकर अभ्यंकर, आयसर पुणेचे संचालक डॉ. सुनील भागवत, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, जनसेवा बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरामठ, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मलाताई गोटे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज् (डिक्की)चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कालिदास मोरे, प्रसिद्ध उद्योजक डॉ. रवी पंडित, तसेच आयएमए पुण्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचा सन्मान यावेळी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.