महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेचचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

जत, सांगली : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या योजनेसाठी नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत ₹७७ कोटी ९४ लाखांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले , योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर जत शहरातील प्रत्येक घराला दररोज शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, नागरिकांच्या दीर्घकालीन पाणीसमस्या दूर होणार आहेत. याप्रसंगी उपस्थित नागरिकांना भविष्यातील पाण्याच्या टंचाईचा विचार करून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले.
ही योजना ही विकासाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे आणि जत शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरणार आहे.
या कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, पै. भीमराव माने आदी मान्यवर उपस्थित होते.