कोणताही रुग्ण केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी मदतीसाठी पुढाकार घेणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

14

मुंबई : गिरगाव परिसरातील चिराबाजार येथे “जीवनस्पर्श” या पारंपरिक आणि आधुनिक उपचारांचा संगम असलेल्या संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे उद्घाटन बुधवारी संपन्न झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते हे उदघाटन करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी माहिती दिली कि, या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू रुग्णांवर वेळेवर आणि सुलभ उपचार उपलब्ध करून देणे. कोणताही रुग्ण केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी मी स्वतः मदतीसाठी पुढे येईन, अशी सद्भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. सेवाभावी उपक्रमांमध्ये सदैव पाठीशी राहीन, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

या प्रसंगी डॉ. मानसी नागरेंकर, हिलर डॉ. सुरेश नागरेंकर आणि हिलर डॉ. अमिता नागरेंकर यांची उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.