‘विकसित पुणे’ या विषयावर दैनिक सकाळच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन

पुणे : नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनातील कामकाजाच्या अनुषंगाने ‘विकसित पुणे’ या विषयावर दैनिक सकाळच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी कसबा मतदारसंघ आणि शहरातील नागरिकांच्या विकासासाठी विधानसभेत मांडलेले प्रश्न, लक्षवेधी, धोरणात्मक निर्णय यावर सविस्तर चर्चा केली.
अधिवेशनाच्या कामकाजावर प्रकाश टाकताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि विधेयकांची माहिती चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना दिली.
▪️गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा
▪️अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना
▪️ महाज्ञानदीप पोर्टलला मान्यता
▪️सांगलीतील इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामांतर
▪️एनआरआय कोट्यातील शिक्षण प्रवेश प्रक्रियेतील सुधारणा व मनमानीवर चाप आणणारे विधेयक अशा निर्णयामुळे यंदाचे अधिवेशन हे अत्यंत फलद्रूप ठरले.
या निर्णयांमुळे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक बदल अपेक्षित असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशनात आपल्या मागणीनुसार सर्वांचा जिव्हाळ्याचा असणाऱ्या गणेशोत्सवाला महायुती सरकारकडून महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलं. मतदारसंघातील वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, महापालिका कर्मचारी तसेच पोलीस वसाहतीचा प्रश्न, प्रस्तावित भुयारी मार्गांसाठीचा पाठपुरावा, जुनेवाडे पुनर्विकास, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, फेक्स मुक्त शहर तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर विधानसभेत घेतलेल्या भूमिकेची माहिती यावेळी देण्यात आली.
या बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, सुनील कांबळे, शंकर जगताप, उमाताई खापरे, अमित गोरखे, बापूसाहेब पठारे, तसेच दैनिक सकाळच्या कार्यकारी संपादिका शितल पवार आणि त्यांची टीम उपस्थित होती.