छायाचित्रणाचा छंद जोपासणाऱ्या आणि अवघ्या नववीत असणाऱ्या सोनाली देशपांडे हिच्या पहिल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपन्न हस्ते

पुणे : तायक्वान्दो स्पर्धांमध्ये सहभाग घेत, छायाचित्रणाचा छंद जोपासणाऱ्या आणि अवघ्या नववीत असणाऱ्या सोनाली देशपांडे हिच्या पहिल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहत त्याची माहिती घेतली. पहिल्याच प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद आणि गौरव पाहता, सोनालीने या कलेचे अधिक सखोल शिक्षण घेऊन पुढील वाटचालीत उत्तुंग यश मिळवावे, अशी सदिच्छा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली आणि सोनालीस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी उपस्थित होते.