विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीला दोष देऊ नये; उलट त्यातून बोध घेऊन आपलं उत्तुंग ध्येय साध्य करावं – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यातील “राष्ट्रप्रथम” ही संस्था वस्ती भागात विद्यादानाचे कार्य करते. या संस्थेच्या कार्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा आज संपन्न झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून सर्व गुणवंतांचे कौतुक केले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीला दोष देऊ नये; उलट त्यातून बोध घेऊन आपलं उत्तुंग ध्येय साध्य करावं. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी बोलताना दिली.
कार्यक्रमाला पुणे शहर पोलीस झोन १ चे उपायुक्त कृषीकेश रावळे, पद्मशाली पंच कमिटीचे अध्यक्ष विनोद जालगी, राष्ट्रप्रथमचे वैभव वाघ, कार्याध्यक्ष ऋषिकेश कायत, विद्यार्थी समन्वयक ओम बिंगी उपस्थित होते.