पौड रोडवरील राहुल कॉम्प्लेक्स येथील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न अखेर मार्गी… कोथरुड मधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध – नामदार चंद्रकांत पाटील

पुणे : पौड रोडवरील राहुल कॉम्प्लेक्स येथील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, ज्यामुळे सोसायटीच्या पुनर्विकासाला अडथळा येत होता. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड जनसंपर्क कार्यालयात सुरु असलेल्या मोफत कायदेशीर सल्ला कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न अखेर मार्गी लागला. आज सोसायटीच्या सभासदांना त्यांची प्रॉपर्टी कार्डे वितरित करण्यात आली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
हा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन सर्व रहिवाशांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राहुल कॅाम्पलेक्सचा प्रश्न सोडवताना अनेकांचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल सर्वांचे पाटील यांनी आभार मानले. कोथरुड मधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यानिमित्ताने पाटील यांनी दिली.
यावेळी माजी मंत्री शशिकांतभाऊ सुतार, पोस्टल बॅंकेचे स्वतंत्र संचालक तथा सोसायटीचे चेअरमन विनयजी गानू, भाजपा कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजप कोथरुड दक्षिण मंडलचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उद्योजक प्रवीण बढेकर, यांच्यासह इतर मान्यवर आणि सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.