भाजपा पुणे शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ यांच्या संयोजनातून कोथरुडमध्ये “शासन आपल्या दारी” या शिबिराचे आयोजन … मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपक्रमास दिली सदिच्छ भेट

पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सेवा व सुविधा या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट पोहोचाव्यात, या उद्देशाने भाजपा पुणे शहराचे सरचिटणीस दुष्यंत मोहोळ यांच्या संयोजनातून कोथरुडमध्ये “शासन आपल्या दारी” या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधत विविध दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले.
या शिबिराचा १३१ लाभार्थ्यांना लाभ झाला असून, त्यांना उत्पन्नाचा दाखला, संजय गांधी निराधार योजना यांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला. या उपक्रमात एकूण ५७८ नागरिकांनी विविध शासकीय सेवा प्रत्यक्षपणे प्राप्त केल्या.
उपक्रमांतर्गत मिळणाऱ्या सेवा म्हणजे , उत्पन्न, जात, राष्ट्रीयत्व व डोमसाईल दाखले, आधार कार्ड व मतदार ओळखपत्र नोंदणी / दुरुस्ती, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र अर्ज, संजय गांधी निराधार योजना अर्ज, शिष्यवृत्ती व योजनांचे मार्गदर्शन, HSRP नंबर प्लेट नोंदणी आणि इतर महत्वाच्या सेवा या अंतर्गत राबविण्यात येत आहेत. संपूर्ण कोथरूडवासीयांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे हा उपक्रम अजून दोन दिवस, म्हणजेच ५ आणि ६ ऑगस्ट रोजीही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.