भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूरचे माजी नगरसेवक निलेश देसाई यांचा भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश

मुंबई : मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत, कोल्हापूरचे माजी नगरसेवक निलेश देसाई यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून, निलेश देसाई यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक जयंत पाटील यांचीही उपस्थिती लाभली.
माजी नगरसेवक निलेश देसाई यांनी दोनदा तर त्यांच्या पत्नी पल्लवी देसाई यांनी एकदा महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. ताराबाई पार्क या प्रभागातून ते निवडून आले होते. भाजपा प्रवेशानंतर बोलताना माजी नगरसेवक निलेश देसाई म्हणाले, मी तीन वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. पत्नी, पल्लवी देसाई या एकदा निवडून आल्या होत्या. प्रभागातील विविध विकासकामांना चालना देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. भाजपकडून विविध विकासकामांची खात्री दिली आहे, विकासकामांना निधी उपलब्ध करुन दिला जातो. त्याद्वारे लोकांची कामे होतात. म्हणून भाजपात प्रवेश केला आहे.