श्रावणी सोमवार निमित्त नामदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील विविध शंकराच्या मंदिरात जाऊन घेतले महादेवांचे दर्शन

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल श्रावण सोमवारनिमित्त, पुणे येथील उमा महेश्वर मंदिरात सपत्नीक महादेवांचा लघुरुद्राभिषेक केला. तसेच राजाराम पूल येथील महादेव मंदिर, कर्वे रोडवरील मृत्यूंजयेश्वर मंदिर आणि वनाझ परिसरातील महादेव मंदिर येथे जाऊन महादेवांचे दर्शन घेतले.
चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक उमा महेश्वर मंदिरात दर्शन घेत सर्वांना समृद्धी, शांती आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना केली. श्रावण महिन्यातील या पवित्र दिवसाच्या त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत सर्वांना भगवान शंकराचा आशीर्वाद लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
दरम्यान पाटील यांनी राजाराम पूल येथील महादेव मंदिर, कर्वे रोडवरील मृत्यूंजयेश्वर मंदिर आणि वनाझ परिसरातील महादेव मंदिर येथे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक शांततेचा अनुभव घेत यावेळी नागरिकांना प्रसाद वाटप करून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. या पवित्र प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.