नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कर्वेनगर येथील पालकर शाळेतील विद्यार्थ्यांना मिलेट्सचे कुकी वाटप

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या सुविधांकडे काटेकोरपणे लक्ष देतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवश्यक सुविधा देण्याकडे त्यांचा कल असतो. कोथरूडमधील प्रत्येक बालक आरोग्यदृष्ट्या सक्षम, निरोगी आणि सशक्त व्हावा, ही त्यांची नेहमीच प्राथमिकता राहिली आहे. यासाठी मिलेट्स हा मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यादृष्टीने कर्वेनगर येथील पालकर शाळेतील विद्यार्थ्यांना आज पाटील यांच्या पुढाकाराने मिलेट्सचे कुकी वाटप केले.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत म्हटले कि, कोथरूडमधील प्रत्येक बालक आरोग्यदृष्ट्या सक्षम, निरोगी आणि सशक्त व्हावा, ही माझी प्राथमिकता राहिली आहे. बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक आहे. मिलेट्स हा मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यादृष्टीने कर्वेनगर येथील पालकर शाळेतील विद्यार्थ्यांना मिलेट्सचे कुकी वाटप केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून खरोखरच प्रेरणा मिळाली, असे यावेळी पाटील म्हणाले. याच कार्यक्रमात विद्यार्थिनींसाठी सॅनेटरी पॅड्स देण्यात आले, जेणेकरून त्यांचे आरोग्यसुद्धा सुरक्षित राहील. आरोग्यदायी उपक्रम आणि समतेच्या दिशेने टाकलेले हे छोटे पाऊल, भविष्यात मोठ्या बदलाची नांदी ठरेल, असा मला विश्वास असल्याचे देखील पाटील म्हणाले.