मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यावर भाजप पदाधिकऱ्यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात भाजपच्या तीन संघटनात्मक जिल्ह्यांच्या आढावा बैठका घेतल्या. दरम्यान कोल्हापूर येथील उत्तरेश्वर मंडलाचे सरचिटणीस अमय भालकर तसेच उत्तरेश्वर मंडलाचे रवींद्र बाबुराव मुळीक आणि सारस्वत बँकेचे शाखाधिकारी शरद जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथील उत्तरेश्वर मंडलाचे सरचिटणीस अमय भालकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. भालकर कुटुंबियांनी केलेल्या अतिथ्याबद्दल त्यांचे पाटील यांनी मन:पूर्वक आभार व्यक्त केले. या प्रसंगी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचीही उपस्थिती होती.
यासोबतच कोल्हापूर येथील उत्तरेश्वर मंडलाचे रवींद्र बाबुराव मुळीक आणि सारस्वत बँकेचे शाखाधिकारी शरद जाधव यांच्या निवासस्थानी देखील पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजप कोल्हापूर महानगर अध्यक्ष विजय जाधव यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.