आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील, कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क मोहीम राबवावी – मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

40

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या तीन संघटनात्मक जिल्ह्यांच्या आढावा बैठका पार पडल्या. या बैठकीत येणाऱ्या 68 जिल्हा परिषद गट, तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींतील राजकीय घडामोडी व स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला.

आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील, कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क मोहीम राबवावी, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
या बैठकीत आगामी निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्याचा निर्धार करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकातील गरजूंना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नागरिकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत असे स्पष्ट केले.

बैठकीस भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार अमल महाडिक, शिवाजीराव पाटील, राहुल आवाडे, माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, राहुल चिकोडे, शौमिका महाडिक, तसेच भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.