‘विल्सन’सारख्या भयंकर आजाराच्या संकटाला तोंड देताना सकारात्मक आयुष्य कसे जगायचे हे ‘अक्की’कडून शिकण्यासारखे – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : अक्षय परांजपे म्हणजेच “अक्की”. पुणेकरांचा लाडका फोटोग्राफर. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अक्कीची भेट घेतली. ‘विल्सन’ या गंभीर आजारावर मात करत जिद्दीने आपली फोटोग्राफीची आवड जोपासणाऱ्या अक्कीची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचा हा संघर्ष आता पुस्तक स्वरूपात आला आहे. हे पाहून अतिशय आनंद झाला, असल्याचे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी अक्षय परांजपे यांच्या जिद्दीचे कौतुक करताना म्हटले, आजकाल काही तरुण नैराश्यामध्ये टोकाचे पाऊल उचलतात. पण ‘विल्सन’सारख्या भयंकर आजाराच्या संकटाला तोंड देताना सकारात्मक आयुष्य कसे जगायचे हे ‘अक्की’कडून शिकण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांची ही कथा सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते, असे पाटील यांनी म्हटले. अक्कीच्या भेटीतून सकारात्मक ऊर्जा मिळाली, असे म्हणत पाटील यांनी यावेळी त्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.