नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये राबविण्यात आलेल्या ‘झाल’ उपक्रमातील माहेरवाशिण महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये राबविण्यात आलेल्या ‘झाल’ उपक्रमातील माहेरवाशिण महिलांचा स्नेहमेळावा आज आशिष गार्डन येथे उत्साहात पार पडला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे महिला भक्कम उभी राहते, त्यामुळेच तो पुरुष यशस्वी होतो, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
‘झाल’ या उपक्रमांतर्गत चंद्रकांत पाटील ज्या घरची परिस्थिती थोडी बेताची आहे अशा नववधूंसाठी भांडी आणि संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून देतात. या कार्यक्रमाला कोथरुडमधील अनेक महिला तसेच रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या ‘झाल’ उपक्रमातील नववधू उपस्थित होत्या. या नववधूंनी मला राखी बांधून भावबंध आणि स्नेहाचा उत्सव साजरा केला.
या कार्यक्रमाला उद्योजिका स्मिता पाटील, माजी नगरसेविका आणि भाजपा मध्य मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षाली माथवड, माजी नगरसेविका अँड वासंती जाधव, छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.